चाळीसगाव: एकाच कुटुंबातील 7 जणांचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कुटुंबातील एक सदस्य आजारी असल्याने त्याला उपचारासाठी चाळीसगावला मॅजिकमधून नेले जात होते. मॅजिकमध्ये सात जण होते. त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलने त्यांच्याच कुटुंबातील दोन जण येत होते. समोरून भरधाव वेगाने येणारी आयशर मॅजिकवर धडकली व तिच्यामागे मोटारसायकलही धडकली. यात मॅजिकमधील पाच व मोटरसायकलवरील दोन जण ठार झाले आहेत.

चाळीसगाव (जि. जळगाव) : राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वरील रांजणगाव फाट्याजवळ टाटा मॅजिक गाडी व मोटारसायकलला समोरून येणाऱ्या आयशरची धडक लागल्याने मॅजिक गाडीतील एकाच कुटुंबातील 7 जण जागीच ठार झाले आहेत.

कुटुंबातील एक सदस्य आजारी असल्याने त्याला उपचारासाठी चाळीसगावला मॅजिकमधून नेले जात होते. मॅजिकमध्ये सात जण होते. त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलने त्यांच्याच कुटुंबातील दोन जण येत होते. समोरून भरधाव वेगाने येणारी आयशर मॅजिकवर धडकली व तिच्यामागे मोटारसायकलही धडकली. यात मॅजिकमधील पाच व मोटरसायकलवरील दोन जण ठार झाले आहेत. ही घटना मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना धुळे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

मृतात राजेंद्र चव्हाण, नामदेव चव्हाण, सीताबाई चव्हाण, नितेश चव्हाण, पंडित राठोड, मिथुन चव्हाण, शुभम चव्हाण यांचा समावेश आहे. या अपघातामुळे ऐन दिवाळीत बोढरे गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Jalgaon news 7 dead in accident near Chalisgaon