महामार्ग रोको अन्‌ पोलिसांनीच अडवली वाहतूक!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

जळगाव - महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांसाठी कृती समितीच्या पुढाकाराने अजिंठा चौकात आज महामार्ग रोको आंदोलन झाले. मात्र, आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीच योग्य ती खबरदारी घेत चौकाच्या चारही बाजूंना ‘बॅरिकेटिंग’ करून अजिंठा चौकातील वाहनांचा प्रवेश रोखला होता. राष्ट्रीय महामार्गावरून परजिल्ह्यांतून जळगावात दाखल होणारी वाहने परस्पर वळविण्यात आल्याने महामार्गावर मोजकीच वाहने आढळून आली. परिणामी, दोन तास रास्ता रोको झाल्यानंतरही प्रत्यक्ष आंदोलनस्थळानजीक कोणतीही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले नाही.

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यापासून कृती समितीतर्फे १० जानेवारीच्या रास्ता रोको आंदोलनासाठी अभियान राबविण्यात आले. सामान्य जळगावकर, विविध सेवाभावी संस्था, नगरसेवक आणि शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना घेऊन रास्ता राको आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पोलिस दलही या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याने, त्यांच्यातर्फे खबरदारीच्या उपाययोजनांचा आराखडा तयार होता. 

त्यानुसार आंदोलकांनी रास्ता रोको करण्यापूर्वीच पोलिस दलाने अजिंठा चौक चारही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे प्रत्यक्ष आंदोलनस्थळापर्यंत वाहने पोहोचू शकली नाहीत.

महामार्गाची वाहतूक वळवली
शहरातील अजिंठा चौक पूर्णत: चार- पाच तास बंद झाल्याने उद्‌भवणाऱ्या परिस्थितीवर पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांचा सलग अभ्यास सुरू  होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर थेट भुसावळच्या नाहाटा महाविद्यालय चौफुलीपासून वाहतूक वळविण्यात आली होती. भुसावळमार्गे अवजड वाहने जामनेर, पाचोरामार्गे वळवली गेली. यासह नशिराबादहून मन्यारखेडामार्गे औरंगाबाद रोड अशी वाहतूक वळवली गेली. दुसऱ्या बाजूने पारोळा येथूनच महामार्ग वळविण्यात येऊन भडगाव, एरंडोलमार्गे म्हसावद, नेरी, वावडदा आणि तेथून पुढे जामनेरमार्गे भुसावळ नाहाटा महाविद्यालय चौक अशी वळवली गेली. औरंगाबादकडून जळगाव शहरात येणाऱ्या वाहतुकीला पहूरमार्गे पाचोऱ्याच्या दिशेने वळविण्यात आले होते.

असा बंदोबस्त...
पोलिस उपअधीक्षक    १ 
निरीक्षक- उपनिरीक्षक    २५
पोलिस कर्मचारी    ३००

Web Title: jalgaon news agitation for parallel road