अमरनाथ यात्रेतील 'देवदूत' सलीम शेखच्या बलसाडला मिरवणुका

सुधाकर पाटील
गुरुवार, 13 जुलै 2017

अभिनंदनाच्या वर्षावाने कुटुंब भारावले, पिंपरखेडला लवकरच भेट देणार 

भडगाव : बस मधील यात्रेकरूसांठी 'देवदूत' ठरलेल्या सलीम शेखच्या बुधवारी बलसाड शहरातून दोन भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. त्याच्या घरी दिवसभर भेटणाऱ्यांची रीघ लागली होती. सोशल मीडियावरही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव पहायला मिळाला. या अभिनंदनाने त्याचे कुटुंब अक्षरशः भारावून गेले. 

अमरनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात बसमधील सात प्रवासी मृत पावले होते. तर 14 जण जखमी झाले आहेत. बसचा चालक सलीम शेख यांच्या समयसुचकतेमुळे बसमधील इतर प्रवाश्याचा जीव वाचला. सलीम शेख हे मुळचे पिंपरखेड ( ता. भडगाव) येथील मुळचा रहीवाशी आहेत. त्याच्यां या कामगिरीचे पिंपरखेड गावात कौतुक करण्यात आले. तर आज ते सध्या वास्तव्यास असलेल्या बलसाड शहरात दोन भव्य मिरवणूक काढण्यात आली. बस मधील मृत पावलेल्याना श्रध्दांजलीही अर्पण करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधीनी त्यांची भेट घेऊन कौतुक केले. दिवसभर त्यांच्याघरी भेटणार्याची गर्दि होती. त्याच्यावर होत अभिनंदनाच्या वर्षावाने त्याचे कुटुंब भारावुन गेले. शोसल मीडीयावरही त्याच्यावर अभिनंदनाच्या पोस्टचा अक्षरशः पाऊस पडला.

दरम्यान 'सकाळ' ने आज राज्यात ठळकपणे सलीम शेखने प्रत्यक्षात अनुभवलेली आपबीती प्रसिद्ध केली. 'सकाळ'च्या या वृत्ताचे कौतुकाच्या प्रतिक्रिया आल्या तर ही बातमी दिवसभर सोशल मीडीयावर फीरत राहीली. त्यांच्या कुटुंबियानीही ही बातमी वाचुन समाधान व्यक्त केले. 

पिंपरखेडला होणार सत्कार
दरम्यान पिंपरखेड गावाचा सुपुत्र असलेला सलीम शेख चा गावाच्या वतीने लवकरच सत्कार मृताना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती बाजार समीतीचे संचालक अॅड विश्वास भोसले, माजी सरपंच नितीन पाटील यांनी सांगीतले. त्याबाबत त्यांच्याशी बोलणेही झाले आहे. सलीम शेख ने ही लवकरच गावी येणार असल्याचे 'सकाळ' ला सांगीतले. गावाकडुन खुप लोकांचे अभिनंदनाचे भ्रमणध्वनी आल्याचेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news amarnath yatra driver salim sheikh felicitated