राज्यघटना लोकशाहीची उदात्त मूल्ये देणारी - राज्यमंत्री खोतकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरू आहे.

देशाच्या प्रगत वाटचालीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर केले.

जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरू आहे.

देशाच्या प्रगत वाटचालीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर केले.

येथील पोलिस कवायत मैदानावर काल प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यानंतर ते बोलत होते. आमदार चंदुलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार मंदार कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री खोतकर म्हणाले, की  साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, कृषी, शिक्षण, आरोग्य, नैसर्गिक साधनसंपत्ती, औद्योगिक, पर्यटन यासह वैचारिक चिंतनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच वाटचाल होत राहावी. यासाठी आपण सगळे मिळून विकासाच्या कल्पक, नावीन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवूया. सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौदार्हपूर्ण समाजनिर्मितीसाठी एकसंघ भावनेतून सर्वांनी कृतिशील होणे गरजेचे आहे.

पथसंचलन, सांस्कृतिक कार्यक्रम
मंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलिस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांनी उघड्या जीपमधून कवायतीची पाहणी केली. कवायतीचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी केले. संचलनात पोलिस मुख्यालय, महिला, पुरुष पथके, वाहतूक शाखा, होमगार्ड महिला व पुरुष पथके, विविध शाळांतील विद्यार्थी, एन.सी.सी. विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पथक, आर.एस.पी. पथके, स्काऊट-गाइड पथक, राष्ट्रीय सेवा योजना आदी पथकांनी सहभाग घेतला. विविध शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पोलिस बॉइजची चित्तथरारक कराटे प्रात्यक्षिके, तन्मय मल्हाराचे योगा पिरॅमिड, गुरुवर्य शाळेतील मुलांच्या समूहनृत्याचा समावेश होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक कराळे यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या देशभक्तिपर चित्रप्रदर्शनास मंत्री खोतकर यांनी भेट दिली.

चित्ररथांनी वेधले लक्ष
पोलिस दलाचे बॅण्डपथक, श्‍वानपथक, बॉम्बशोधक पथक, वरुण रथ, निर्भया पथक, महापालिकेचे अग्निशामक व बचाव पथक, ॲम्ब्युलन्स १०८, मुद्रा बॅंक योजना प्रचार व प्रसार समन्वय समितीतर्फे तयार करण्यात आलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला व बालविकास विभागाचा ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’, कृषी विभागाचा जलयुक्त शिवार, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा सर्व शिक्षा अभियान, सामाजिक वनीकरण विभागाचा झाडे लावा, झाडे जगवा चित्ररथ दाखविण्यात आले. पोलिस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या देशभक्तिपर गीतांच्या धूनवर झालेल्या शिस्तबद्ध, जोशपूर्ण संचलनाने कार्यक्रमस्थळावरील वातावरण भारावले होते.

यांचा झाला सन्मान
पोलिस दलात शौर्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल योगेश तांदळे, युवराज रबडे, अजितसिंग देवरे, युवराज पाटील, नंदकिशोर सावखेडकर, सामाजिक वनीकरण विभागातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेता रूपेश बिऱ्हाडे, राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल विनोद अहिरे व ग्रुप आणि डॉ. प्रा. अनिता पाटील, डॉ. नीलेश चांडक, मुकुंद गोसावी यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: jalgaon news arjun khotkar talking