जळगावात बांधकाम ठेकेदाराचा भरदिवसा खून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

जळगावात बांधकाम ठेकेदाराचा भरदिवसा खून 

जळगावात बांधकाम ठेकेदाराचा भरदिवसा खून 

जळगाव : शहरातील खेडी पेट्रोल पंपा जवळ आज सकाळी एका बांधकाम ठेकेदाराचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 
या संदर्भात अधिक असे की,  खेडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास विपिनसिंग दिनकर मोरे (वय ३५ रा. खेडी) हे आपल्या दुचाकीवरून जात होते. याचवेळी तिघांनी येत त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात विपिनसिंग जागीच ठार झालेत. घटनास्थळी काही वेळ प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, विपिनसिंग आणि मारेकऱ्यांमध्ये अनेक दिवसापासून वाद होता. अनेकवेळा पोलिसात तक्रारी देखील झाल्या होत्या. परंतू आज थेट या वादातून विपिनसिंगचा खूनच झाला. घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news bildar murdar