पणन महासंघातर्फे 25 पासून कापूस खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जळगाव - खानदेशात 25 ऑक्‍टोबरपासून राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे कापूस खरेदीस सुरवात होणार आहे. खानदेशातील 13 केंद्रावर खरेदी सुरू होईल. जळगाव जिल्ह्यात 9, नंदुरबारला दोन, धुळे जिल्ह्यात दोन अशी केंद्रे असतील. चांगल्या कापसाला यंदा 4 हजार 320 भाव असेल अशी माहिती पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप व्यवस्थापक एस. के. पाटील, ग्रेडर अनिल कदम उपस्थित होते. 

ऑनलाइन नोंदणी गरजेची 
शेतकऱ्यांना आपला कापूस खरेदी केंद्रावर आणून रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ज्याठिकाणी कापूस खरेदी होईल तेथील बाजार समितीत अगोदर येऊन कपाशीची ऑनलाइन नोंदणी करावी. सोबत येताना आधार कार्ड, बॅंकेचा अकाउंट क्रमांक, सात-बारा उतारा (कपाशीचा पेरा असलेला), मोबाईल क्रमांक सोबत न्यावा. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मेसेज पाठविला जाईल त्यात दिवस व वेळ दिली जाईल, त्यावेळी शेतकऱ्यांनी कापूस संबंधित बाजार समितीत आणून त्याची विक्री करावी. यामुळे शेतकऱ्यांना रांगेत थांबण्याची गरज नसेल. ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 

खानदेशातील केंद्रे अशी 
जळगाव जिल्हा ः जळगाव, भुसावळ, जामनेर, पहूर, शेंदूर्णी, पाचोरा, बोदवड, एरंडोल, चाळीसगाव. 
नंदुरबार जिल्हा ः नंदुरबार, शहादा 
धुळे जिल्हा ः दोंडाईचा, शिरपूर. 

असे असेल भाव (प्रति क्विंटल) 
बन्नी/ब्रह्म-- 4 हजार 320 
एच-4/एच 6--4 हजार 220 
एलआरए-5166--- 4 हजार 120

Web Title: jalgaon news cotton