चॉपरने हल्ला करून तरुण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

जळगाव - शहरातील औद्योगीक वसाहत परिसरातील ऑटोनगर भागात कमलेश ढाब्यावर रात्री साडेबाराला चॉपरने हल्ला करून तरुणाला जखमी करण्यात आल्याची घटना घडली. किरकोळ वादातातून दारूच्या नशेत असलेल्या पाच ते सहा टोळक्‍याने दोघा तिघांना मारहाण करून एकाच्या मांडीत चॉपर खुपसला. जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून औद्योगीक वसाहत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

शहरातील तांबापुरातील रहिवासी तथा रिक्षा चालक अफजल खान कालूखान (वय 28) हा लहान भाऊ, भाचा व इतर नातेवाईक तरुणांना घेऊन जेवणासाठी ढाब्यावर गेले होते. राष्ट्रीय महामार्गावर कालिकामाता मंदिर ते अजिंठा चौफुली दरम्यान ऑटोनगर भागात "कमलेश ढाबा' येथे जेवणाला बसले असताना पायाचा धक्का लागल्याने वाद झाला. समोरच्या टेबलावर दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या तरुणांच्या टोळक्‍याने कंबरेतून चॉपर काढत या तिघा-चौघांवर हल्ला चढवला. शस्त्र पाहताच अफजल सोबतच्या इतरांनी पळ काढला. अफजल त्यांच्या तावडीत सापडल्याने त्यातील एकाने धारदार चॉपर एका मागून ऐक दोन तीन वेळेस त्याच्या मांडीत खुपसून जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी अफजल याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेत अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: jalgaon news crime

टॅग्स