ताब्यात घेतलेला  मोबाईलचोर निसटला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

जळगाव - बसमध्ये चढत असताना तरुणाचा मोबाईल चोरणाऱ्या भामट्यास आज शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अटकेनंतर त्याच्याकडून चोरीला गेलेला 20 हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून जिल्हापेठ पोलिसांना हस्तांतर करण्यापूर्वीच या चोरट्याने अलगद रित्या पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलिस या चोरट्याचा शोध घेत होते. 

जामनेर येथील शुभम संजू पाटील (वय 20) हा तरुण जळगावात आला असताना चार ऑगस्टला नवीन बसस्थानकावरून त्याचा मोबाईल चोरीला गेला होता. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने शुभमच्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरल्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिपेठ पोलिस ठाण्याचे डिबी कर्मचारी जितेंद्र सोनवणे व अमित बाविस्कर यांना बसस्थानकावरील मोबाईल चोरीतील संशयित हा कोळी पेठेतीत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, गणेश गव्हाळे यांनी संशयित मोहन प्रकाश भारुडे (वय 20) याला रीतसर ताब्यात घेत, जिल्हापेठ पोलिसांना संशयित ताब्यात घेतल्याची माहिती कळवली. यावेळी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून चोरीला गेलेला महागडा मोबाईल मिळून आला आहे. जिल्हापेठ पोलिसांना संशयित हस्तांतरित करण्यात येणार होता, मात्र तत्पूर्वीच मोहन भारुळे या संशयिताने अलगदपणे पोलिस ठाण्यातून पळ काढला. 

मोहन भारुळे या संशयिताविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल आहे, मिळालेल्या माहितीनुसार आम्ही त्याला कलम-41 नुसार ताब्यात घेतला, चौकशी केली. त्याच्या जवळ ऍपल कंपनीचा मिळून आलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. असेही कायद्यात नमूद केल्यानुसार कलम-41 नुसार केवळ चौकशी करून सोडून देण्यात येते. 
- प्रवीण वाडीले,  पोलिस निरीक्षक शनिपेठ

Web Title: jalgaon news crime