नोटाबंदीने जिल्हा बँका अडचणीत : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

पीककर्ज मिळविण्यात शेतकऱयांना अडचण येत असून, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्या बॅंकांना मदत करावयास हवी, अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली

चोपड़ा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँका अडचणीत आल्या असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी आज (सोमवार) व्यक्त केले. पीककर्ज मिळविण्यात शेतकऱयांना अडचण येत असून, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्या बॅंकांना मदत करावयास हवी, अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली.

याचबरोबर, यासंदर्भात नाबार्ड व रिझर्व्ह बँकेकडूनही सहाय्य्य मिळावयास हवे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. पवार हे ज्येष्ठ राजकीय नेते अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलता होते. यावेळी, 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ राजकीय नेते सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे, हरिभाऊ बागडे व एकनाथ खडसे आदी नेतेही उपस्थित होते. 

Web Title: Jalgaon News: Demonetization mars district banks, says Sharad Pawar