साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजारांचा फैलाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

जळगाव - शहरातील नागरी वस्त्यांमधील सखल भागांत व खुल्या भूखंडांवर साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढू लागली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा उद्रेक वाढल्याने साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे या पाण्याचा निचरा, तसेच स्वच्छता होण्याची गरज असूनही महापालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या २१ जुलैला झालेल्या सभेत नगरसेवक अनंत जोशी यांनी शहरात साथीच्या रोगांच फैलाव होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही प्रशासन सुस्तच असल्याचे दिसते.

सध्या पावसाळा सुरू असल्याने शहरातील अनेक सखल भागांत डबकी साचलेली दिसत आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांच्या उत्पत्ती वाढते. त्यामुळे मलेरिया, टायफॉइड, न्यूमोनिया आदी आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच नागरी वस्त्यांमध्येही खुल्या भूखंडावर साचलेल्या सांडपाण्याचा देखील मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

मध्यवर्ती ठिकाणांवर डबकी साचली
शहरातील मुख्य भाग, बाजारपेठ, संकुलाच्या ठिकाणी असलेल्या सखल भागात पाणी साचून मोठे डबके तयार झालेले आहे. यामध्ये नेरी नाका, जिल्हा परिषदनजिकचा परिसर, न्यू. बी. जे. मार्केटमधील भंगार बाजार अशा विविध ठिकाणी पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यात कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी व डासांचा त्रास वाढू लागलेला आहे. 

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
शहरातील विविध वस्त्यांमध्ये सांडपाण्यामुळे तसेच पावसाच्या पाणी खुल्या भूखंडात साचलेले आहे. त्यामुळे विविध आजार डास, दुर्गंधीमुळे नागरिक आजारी पडत आहे. त्यातच किडे, साप, विंचू नागरी वस्त्यांमध्ये निघण्याचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

पाण्याचा निचरा आवश्‍यक
पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलेले आहे. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कुठलीही पाऊले उचललेली दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून त्वरित पाण्याचा निचरा करावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

‘स्थायी’त चर्चा होऊन प्रशासन सुस्त
महापालिकेच्या स्थायी समितीच्या २१ जुलैला झालेल्या सभेत नगरसेवक अनंत जोशी यांनी शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असून साथीच्या रोगांचा फैलाव होत असल्याचा आरोप केला होता. तसेच आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, तरीदेखील महापालिका प्रशासन सुस्तच असल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

Web Title: jalgaon news diseases health