सासू-सुनेच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष

जगन्नाथ पाटील
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

धुळे : नगाव (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार कै. द. वा. पाटील यांच्या कुटुंबातील सासू-सुनेची लढत लक्षवेधी ठरत आहे. माजी सरपंच सुशीलाबाई पाटील व पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांच्यातील लढतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच पदासाठी इतरही दोन महिला उमेदवार आहेत. पण येथील लढत चौरंगी होण्यापेक्षा दूरंगीच होणार आहे. हे सर्वज्ञात आहे. सासू-सुनांमध्येच लढत असतांना इतरांची उमेदवारी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात विरोधकांचा सुज्ञपणा असल्याचेही चर्चिले जात आहे.

नगाव, तीसगाव, वडेल, ढंढाणे व रामनगर या पाच गावांची गट ग्रामपंचायत आहे. सरपंच पदासाठी चार आणि सदस्यत्वासाठीच्या पंधरा जागांसाठी लढती होत आहेत. सरपंच पदासाठी माजी सरपंच सुशीलाबाई पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे, रोहीणी पाटील व उर्मिला पाटील असे चार उमेदवार आहेत. यात माजी आमदार कै. द. वा. पाटील यांच्या पत्नी व सून यांच्यातच खरी लढत होत आहे. सासू सूनेमधील लढतीत पाटील यांचे समर्थक अडचणीत सापडले आहेत. मतदान नेमके कोणाला करावे. हा त्यांच्या समोरील प्रश्न आहे. इतर दोघा विरोधकांनीही आव्हान उभे केले आहे. त्यांची मतेही निर्णायक होवू शकतात. दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ अशीही चर्चा सुरु आहे.

भाजपातील अंतर्गत कलह
भाजपातील मनोहर भदाणे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांच्या विरोधात भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. राहूल पाटील यांनीच दंड थोपटले आहे. भाजपाचे अामदार अनिल गोटे यांचे समर्थक लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणेही आव्हान उभे करीत आहेत. भाजपातील मंडळीच आपापसांत लढत असल्याचे येथे चित्र आहे. वरीष्ठ पातळीवर याबाबतीत शांतता अाहे. गावगाड्याच्या निवडणूकीत एवढे तेवढे चालेलच अशी सावध प्रतिक्रीयाही व्यक्त होत अाहे.

भदाणे प्रचारात आघाडीवरच
माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांनी प्रचारात अाघाडी घेतली आहे. चारही गावांच्या भेटीगाठी घेणे सुरु आहे. स्वतंत्र जाहिरनामा प्रसिध्द केला आहे. सद्यस्थितीत बाजू वरचढच आहे.

...तर असे झाले असते म्हणून
माजी आमदार कुटूंबातील सासू सूना एकमेकांसमोर उभ्या आहेत. विरोधकांनी घरातच महाभारत उभे केले आहे. विधानसभा निवडणूकीतही बरेच काही घडले होते. दोन्ही विरोधक असतांना आणखी दोन उमेदवार का आहेत, असा प्रश्नही निर्माण होत आहे. कदाचित मनोहर भदाणे, ज्ञानज्योती भदाणे व राम भदाणे हे तीन्ही संमजसपणे घेत माघार घेतील . अन आपल्याच आई सरपंच होत आहेत. असे समाधान मिळवितील. असे होवू नये. म्हणूनही दोघांची उमेदवारी महत्वपूर्ण ठरत असल्याचे समजते.

Web Title: jalgaon news District's attention with the fight of mother-in-law