जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

जळगाव - कानळदा (ता. जळगाव) येथील सुभाष धुडकू पाटील (वय 48) या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. दोन वर्षांपूर्वी मुलीच्या विवाहासाठी घेतलेले कर्ज आणि दोन तरुण मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ग्रासल्यामुळे त्यांनी मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे.

बाहेर फिरून येतो, असे सांगून पाटील काल सायंकाळी घरातून गेले होते. ते रात्रभर घरी परतलेच नाही. आज सकाळी जळगाव रस्त्यावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते दिसून आले.

Web Title: jalgaon news farmer suicide