गरबा, दांडिया प्रशिक्षणासह पाच दिवसांचे मोफत शिबिर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

जळगाव - गणेशोत्सवानंतर आता सर्वत्र दुर्गोत्सवाचे वेध लागले आहेत. नवरात्रोत्सव म्हणजे गरबा, दांडिया खेळण्याचा जणू उत्सवच. देवीची आराधना गरबा, दांडियाच्या रूपातही करीत असतो. या उत्सवात रंग भरण्यासाठी विशेष गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होऊन नवरात्रोत्सवामध्ये आनंद द्विगुणित करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.

‘सकाळ माध्यम समूह’ व ‘पॅसिफिक ॲकॅडमी’ यांच्या संयुक्‍त विद्यमाने प्रशिक्षण शिबिर १५ ते १९ सप्टेंबर अशा पाच दिवसांचे असेल. गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सर्वत्र दुर्गोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने युवक- युवतींसाठी आकर्षण असते, ते म्हणजे गरबा, दांडियाचे. साधारण पंधरा दिवसांपासून याचा सराव करण्यास सुरवात केली जाते. त्या अनुषंगाने ‘सकाळ’च्या पुढाकाराने गरबा- दांडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर गणेश कॉलनी परिसरातील आदिती महिला मंडळ हॉल येथे सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत होईल. यात कोरिओग्राफर सुनील चव्हाण, खुशबू संचेती हे प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणाच्या पाच दिवसांच्या कालावधीत विविध गरबा, दांडियाच्या विविध स्टेप्स्‌ शिकविण्यात येणार आहेत. ‘सकाळ- मधुरांगण’, ‘एनआयई’ आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून होत असलेल्या शिबिरात महिला, युवक, लहान मुले-मुली सहभागी होऊ शकणार आहेत.

प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य 
शिबिरात ‘मधुरांगण’, ‘एनआयई’ व ‘यिन’ सभासदांसाठी प्रवेश मोफत आहे, तर अन्य सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी दोनशे रूपये प्रवेश शुल्क आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या प्राधान्य असून, नोंदणी ‘सकाळ’ कार्यालय, गोलाणी मार्केट येथे सुरू आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी मुनिरा तरवारी (९८८११५४२१८), हर्षदा नाईक (८६२३९१४९२६) व अंकुश सोनवणे (९६८९०५३२११) यांच्याशी संपर्क साधावा. प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले. 

Web Title: jalgaon news garba, dandia training free camp