चाळीसगाव: तालुक्यातील वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये गॅस वाटप

शिवनंदन बाविस्कर
रविवार, 17 सप्टेंबर 2017

वन विभागाकडून ज्या गावांनी वन संरक्षणात सहभाग घेऊन अवैध वृक्षतोड, वन जमिनीवरील अतिक्रमण, शिकार, वनवा, अवैध चराई यांना प्रतिबंध केला. अशा गावातील ग्रामस्थांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. त्यात जुनपाणी(53), राजदेहरे/घोडेगाव(134), राजदेहरे(सेटलमेंट)(41) या गावांमधील 228 लाभार्थ्यांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे  वितरण आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : वनक्षेत्रालगत असलेल्या तालुक्यातील जुनपाणी, राजदेहरे, घोडेगाव या गावांमधील लाभार्थ्यांना शुक्रवारी(ता. 15) आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते वन विभागाकडून गॅसचे वाटप करण्यात आले.

वन विभागाकडून ज्या गावांनी वन संरक्षणात सहभाग घेऊन अवैध वृक्षतोड, वन जमिनीवरील अतिक्रमण, शिकार, वनवा, अवैध चराई यांना प्रतिबंध केला. अशा गावातील ग्रामस्थांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. त्यात जुनपाणी(53), राजदेहरे/घोडेगाव(134), राजदेहरे(सेटलमेंट)(41) या गावांमधील 228 लाभार्थ्यांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे  वितरण आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार श्री. पाटील यांनी वनांचे जास्तीत जास्त रक्षण करण्याचे आवाहन केले. तर प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी संजय एस. मोरे यांनी वन विभागाच्या योजनेबद्दल माहिती दिली. तसेच शासनाच्या पुढील वर्षात 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड योजनेत सहभागी व्हा असेही आवाहन श्री. मोरे यांनी केले. 

याप्रसंगी उप सभापती संजय पाटील, दिनेश बोरसे, मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे, बाळासाहेब राऊत, जुनपाणीचे सरपंच, वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष व राजदेहरे व घोडेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी वनपाल प्रकाश पाटील(घोडेगाव), वनरक्षक संजय पाटील(जुनपाणी), वनरक्षक संजय चव्हाण(घोडेगाव), अजय महिरे, वनरक्षक राहुल पाटील, बाळू शितोळे, संजय देवरे, गोरख शेलार, वनमजूर व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Jalgaon news gas connection in Chalisgaon