थंड हवेचे पाल 43 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

रावेर - जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाल (ता. रावेर) येथील उष्णतेचा पारा गेल्या तीन दिवसांपासून 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे. यामुळे पाल हे थंड हवेचे ठिकाण असल्याचा इतिहास फक्त पुस्तकापुरता उरल्याचे सिद्ध झाले आहे. तीव्र उन्हाच्या चटक्‍यांमुळे गावातील व परिसरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसत आहे. 

साधारणतः एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मेचा पहिला पंधरवडा या दरम्यान या भागातील वातावरणातील तापमानात वाढ होते; मात्र या वर्षी कमी पडलेला पाऊस, सातपुडा पर्वत भागातील वृक्षलागवडीपेक्षा प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोडी यामुळे या भागातील तापमान सातत्याने वाढतच आहे. गतवर्षी येथे मेमध्ये 44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते; मात्र या वर्षी मार्चअखेर व आताच उष्म्याचा पारा 43 अंशांवर पोचला आहे. 

पाल येथील हॉर्टिकल्चर कार्यालय व सातपुडा विकास मंडळाच्या कृषी विभागातील कार्यालयात तापमापक यंत्रात 31 मार्च 1 व 2 एप्रिलला 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

Web Title: jalgaon news high temperature