अवैध वाळू उपशाप्रकरणी होणार १६ लाखांचा दंड

जळगाव - अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जप्त केलेले डंपर.
जळगाव - अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जप्त केलेले डंपर.

जळगाव - गेल्या शुक्रवारी (ता. १६) रात्री दोनगाव (ता. धरणगाव) नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून नेणारे सहा डंपर व एक ट्रॅक्‍टर आव्हाणे व ममुराबाद रोड परिसरात पकडण्यात आले. त्यांच्याकडून नवीन वाळू धोरणानुसार दंड आकारण्यात येणार आहे. त्यानुसार ही दंडाची रक्कम १६ लाखांच्या घरात जाणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
शासकीय नियमानुसार ज्या गटामधून वाळू उपसा करणे बंधनकारक असते.

तसे न करता वाळू ठेकेदार तहसीलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संबंध जोपासत आपल्या अपेक्षेच्या गटातून वाळू उपसा करीत असल्याचे चित्र आहे. यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दोनगाव नदीपात्राचा ठेका ज्या ठेकेदाराने घेतला आहे, तो शासकीय नियमांचे उल्लंघन करीत मर्जीतील गट क्रमांकातून वाळू उपसा करीत असल्याचे माहिती समोर आली आहे. यामुळेच प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्यासह महसुलाच्या पथकाने शक्कल लढवीत रात्री आठनंतर नदीपात्राच्या परिसरात जाऊन डंपरवर कारवाई केली. रात्री केलेल्या कारवाईतून दंडातून मोठी रक्कम मिळणार असून, वाळू उपशाच्या नवीन धोरणानुसार दंडात्मक कारवाई ही अवैध वाळू वाहतूकदारांचे कंबरडे मोडणारी ठरणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com