जळगाव जिल्ह्यासह खानदेशात 'बंद'ला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

जळगाव: भीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदला काहीसे हिंसक वळण लागले. भुसावळ येथे बसवरील दगडफेकीत चार प्रवासी जखमी झाले. तर काही समाजकंटकांनी यावल तालुक्‍यातील सांगवी येथे दोन, सावदा येथे एका बसची तोडफोड केली. धुळे जिल्ह्यातही शिरपूर येथे अज्ञात तरुणांनी बसची तोडफोड केली.

भीमा-कोरेगावच्या घटनेचे जळगाव जिल्ह्यात मंगळवारपासूनच तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी राज्यव्यापी बंदची हाक दिल्याने बुधवारी त्याचा परिणाम जनजीवनावर झाला. आज सकाळपासूनच जळगावसह जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भुसावळला अज्ञात समाजकंटकांनी बसवर दगडफेक केल्याने बसमधील चार प्रवासी जखमी झाले, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर यावल तालुक्‍यात सांगवी येथे दोन, रावेर तालुक्‍यातील सावदा येथे एका बसची तोडफोड करण्यात आली. चोपडा, अमळनेरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भडगाव, पारोळ्याला दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला, नंतर बाजारपेठ सुरु झाली.

बससेवा पूर्णपणे बंद
जळगावसह जिल्ह्यातील विविध आगारांमधून निघणाऱ्या बस बंद करण्यात आल्या. दिवसभरात हजारांवर बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही तुरळक ठिकाणच्या गावांसाठी बसफेऱ्या सुरु होत्या.

धुळे जिल्ह्यात तीव्र पडसाद
धुळे शहरासह जिल्ह्यात या घटनेचे सोमवारी रात्रीपासूनच तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सोमवारी रात्री व मंगळवारी काही प्रतिष्ठानांची तोडफोड केल्यानंतर आज बंदच्या दिवशी धुळे शहरात दलित संघटनांनी भव्य मोर्चा काढला. मोर्चादरम्यान दोन ठिकाणी दगडफेक झाली. शिरपूर तालुक्‍यात अज्ञात तरुणांनी बसवर दगडफेक करत तोडफोड केली.

Web Title: jalgaon news koregaon bhima issue and jalgaon band