'माँ पद्मावती'च्या सन्मानार्थ राजपूत समाज एकवटला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मानार्थ मोर्चा; प्रदर्शनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी

जळगाव: पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्याने याच्या निषेधार्थ तसेच राजपूत समाजाचा चुकीचा इतिहास दाखविल्याने माँ पद्मावती यांच्या सन्मानार्थ आज (शुक्रवार) जळगावातून राजपूत समाज व हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभाग होवून प्रचंड घोषणाबाजी केली.

महाराणा प्रताप स्मृती दिनानिमित्त माँ पद्मावती सन्मान मोर्चा कृती समितीच्यावतीने आज माँ पद्मावती यांच्या सन्मारार्थ व संजय लीला भन्साली यांच्या पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनाला मान्यता मिळाल्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील नूतन मराठा महाविद्यालय येथून दुपारी एकला मोर्चास सुरवात होवून, रिंगरोड मार्गाने जावून महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर मोर्चा भास्कर मार्केट, स्वातंत्र चौक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. सदर मोर्चाचे नेतृत्व विद्यार्थी व महिलांनी केले. मोर्च्यात राजपूत समाजाचे हजारो बांधवांसह शहरातील विविध संघटनांचा सहभाग होता. यावेळी संजय लीला भन्साली यांच्या पद्मावत या चित्रपटात राजपुतांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आला असताना, त्याला प्रदर्शित करण्यास मान्यता मिळाल्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: jalgaon news maa padmavati and rajput samaj