तीन अपत्ये असताना मित्रासोबत पत्नीचा घरोबा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

जळगाव - माहेरी जाण्याचे सांगून लहान मुलीस घेऊन गेलेली विवाहिता पतीच्या मित्रासोबतच घरोबा करून राहत असल्याचा प्रकार समोर आला. सासूला ती आज अचानक दिसल्यावर सून व ज्याच्यासोबत घरोबा करून राहते त्या तरुणाने विवाहितेच्या सासूला मारहाण केली व प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोचले. तीन लेकरांची आई असलेली ही विवाहिता त्या तरुणाची साथ सोडायला तयार नसल्याने पोलिसांनीही डोक्‍याला हात मारून घेतला.

जळगाव - माहेरी जाण्याचे सांगून लहान मुलीस घेऊन गेलेली विवाहिता पतीच्या मित्रासोबतच घरोबा करून राहत असल्याचा प्रकार समोर आला. सासूला ती आज अचानक दिसल्यावर सून व ज्याच्यासोबत घरोबा करून राहते त्या तरुणाने विवाहितेच्या सासूला मारहाण केली व प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोचले. तीन लेकरांची आई असलेली ही विवाहिता त्या तरुणाची साथ सोडायला तयार नसल्याने पोलिसांनीही डोक्‍याला हात मारून घेतला.

नेपानगर (मध्य प्रदेश) येथील मूळ रहिवासी सागर यादव-पाटील (वय-२९) याचा उषा (वय-२५) (काल्पनिक नावे) हिच्याशी नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला. सागरचे आई-वडील एका कंपनीत कामगारांचे जेवण बनविण्यासह वॉचमन म्हणून राहतात तर सागर एका कंपनीत कामाला आहे. त्याचा जोडीदार गोपाल यांची पक्की यारी. सागर व उषा या दाम्पत्याला तीन मुली. दोन्ही मुली गावी, तर लहानगी सोबत राहते. 

असा समोर आला प्रकार
दोन महिन्यांपूर्वी पती-पत्नीत किरकोळ वाद झाल्याने माहेरी जाते म्हणून उषा निघून गेलेली. आज दुपारी सासूबाई कामानिमित्त गेली असता उषा तिला गोपालसोबत दिसली. विचारपूस केल्यावर दोघांत भांडण होऊन झटापट झाली. प्रकरण पोलिसांत धडकले. सागर व त्याची आई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यावर पोलिसांनी गोपाल पाटीलला फोन करून बोलावले. तो उषा, त्याची आई व एक शेजारी महिलेसह पोलिस ठाण्यात आला. विचारपूस केल्यावर उषाने पती सागर मारहाण करतो, दुसरा नवरा करून घे असे सांगत त्रास देतो म्हणून मी दुसरा नवरा केल्याचे सांगितले. नुकतेच मिसरुड फुटलेला, कुटुंबात एकटी आई, वडील वारलेले, मजुरी करणारा मात्र देखणा तरुण गोपालही ‘आम्ही सोबत राहणार’ असल्याचे सांगितले. 

पोलिसांची मध्यस्थी निष्फळ
पोलिसांनी मध्यस्थी करीत ‘त्याची बायको देऊन टाक’ म्हणून सांगून पाहिले. मात्र, गडी ऐकायलाच तयार नाही.. अखेर त्याच्या आईला समजावले.. आधार कुणीही नसल्याने आईनेही समजूत काढली.. तुझं दुसरं लग्न होईल.. आणखी चांगली पोरगी मिळेल असे सांगितले.. मात्र, उषा काही त्याला सोडायला तयार नव्हती. इकडे सागर मुलीला जवळ घेण्यासाठी विनवण्या करीत होता... मात्र, उपयोग झाला नाही.

तीन मुलींची आई म्हणते, ‘जिना- मरना तेरे संग..’
‘..आम्ही पैसा लावून हिला तिच्या आई-वडिलांकडून आणले, तसे आम्ही तिच्या आई-वडिलांना तिला सोपवतो. तेथून तू घेऊन जा... सोबत तिच्या तिन्ही मुलींनाही वागव..’ असं सांगत सागरच्या आईने तोडगा काढला. मात्र, उषा नाहीच म्हणे... त्याचे पोरं त्याने सांभाळावे मी, त्याच्यासोबत राहणारच नाही... आता दुसऱ्यासोबतच राहील’ असे तिने पोलिसांना सांगून टाकले... अखेर पोलिसांनी जाबजबाब लिहून घेत कायद्याने सज्ञान असल्याने दोघांना आपसांत प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला.

Web Title: jalgaon news marriage issue