एमबीए सीईटीचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

जळगाव - विद्यार्थ्यांना एमबीए प्रवेशासाठी अनिवार्य सीईटी परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन अर्ज/फॉर्म भरण्याची निःशुल्क सुविधा शहरातील दोन मॅनेजमेंटच्या महाविद्यालयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमबीएच्या प्रायव्हेट सीईटी परीक्षेचे स्कोअरकार्ड प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य होणार नाही. त्यामुळे शासनाने जारी केलेली फक्त सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे. हे ऑनलाइन अर्ज रायसोनी मॅनेजमेंट ऑफ इन्स्टिट्यूट व आयएमआर महाविद्यालयात उपलब्ध आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डी.टी.ई) अधिसूचनेनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ एमबीए पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रवेशासाठी सीईटी (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) म्हणजेच सामाईक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. यासाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेतील पुरेशी माहिती, कागदपत्रे अशा विविध तांत्रिक अडचणी येतात.

मागील वर्षी अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याने त्यांना शासनाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळू शकला नाही. तसेच या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. गेल्या तीन वर्षांचा विचार केल्यास अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. त्यामुळे प्रवेश मिळाला नाही. यावेळी ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टिकोनातून महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्राध्यापक ऑनलाइन अर्ज भरून देण्यासाठी मदत करतील. 

अशी आहे प्रवेशप्रक्रिया
 २३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी : ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 
 २६ फेब्रुवारी : प्रवेशपत्र (हॉल तिकीट उपलब्ध होतील)
 १० व ११ मार्च : ऑनलाइन परीक्षा 
 १९ मार्च : सीईटी परीक्षेचा निकाल

Web Title: jalgaon news mba cet online form submission