एजन्सीने केलेल्या मीटर रीडिंगची ‘महावितरण’कडून पुन्हा तपासणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

जळगाव - ‘महावितरण’ने वीजमीटर रीडिंगचे काम एजन्सीला दिले आहे. बऱ्याचदा रीडिंग चुकीचे घेतले जाते. त्याची पाहणी करण्यासाठी रीडरने घेतलेल्या रीडिंगपैकी पाच टक्‍के मीटरचे पुन्हा रीडिंग घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात याची सुरवात करण्यात आली आहे.

जळगाव - ‘महावितरण’ने वीजमीटर रीडिंगचे काम एजन्सीला दिले आहे. बऱ्याचदा रीडिंग चुकीचे घेतले जाते. त्याची पाहणी करण्यासाठी रीडरने घेतलेल्या रीडिंगपैकी पाच टक्‍के मीटरचे पुन्हा रीडिंग घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात याची सुरवात करण्यात आली आहे.

‘महावितरण’ने ग्राहकांच्या वीजमीटरचे रीडिंग व्यवस्थित व अचूक घेतले पाहिजे. मीटर रीडिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘महावितरण’कडून रीडरने घेतलेल्या रीडिंगपैकी पाच टक्के मीटर रीडिंगची स्थळभेटीव्दारे दैनंदिन तपासणी केली जात आहे. मीटर रीडिंगमध्ये तफावत आढळल्यास रीडरवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार योग्य बिल मिळणार आहे. ग्राहकांच्या वाढीव वा चुकीच्या वीजबिलाच्या तक्रारी कमी होतील आणि ‘महावितरण’ची महसुलाची हानी कमी होईल.

तपासणीस सुरवात
‘महावितरण’च्या या मोहिमेंतर्गत पाचोरा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी ग्राहकांच्या पाच टक्के मीटर रीडिंगची स्थळभेटीद्वारे तपासणी केली. त्यावेळी त्यांनी ‘महावितरण’च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाच टक्के मीटर रीडिंगची दैनंदिन तपासणी तातडीने करून तफावत दिसून आल्यास दोषी मीटर रीडर व मीटर रीडिंग एजन्सीवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. याशिवाय, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पालिका पथदिव्यांच्या थकबाकीची वसुली गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.

यादी देऊन स्थळभेटी
मीटर रीडरने घेतलेल्या दैनंदिन मीटर रीडिंगच्या प्रणालीत नोंद झाल्यानंतर ‘महावितरण’च्या मुख्यालयामार्फत रोज चारला त्या रीडिंगपैकी पाच टक्के ग्राहकांच्या नावांची यादी मीटर रीडिंगची स्थळभेटीद्वारे तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येत आहे. यासाठी नियुक्त स्थानिक ‘महावितरण’चे अधिकारी- कर्मचारी त्याच दिवशी रीडिंग घेऊन प्रणालीत नोंदवितात. मीटर रीडरने घेतलेल्या मीटर रीडिंग व तपासणीतील मीटर रीडिंग यांची पडताळणी होत आहे. यात दोषी आढळलेल्या मीटर रीडरवर धुळे, नंदुरबार, शहादा, मुक्ताईनगर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: jalgaon news mseb

टॅग्स