कमी पगार देणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

जळगाव - महापालिकेने दैनंदिन साफसफाईबाबत शहरात अनेक वॉर्डांत मक्ता दिला आहे. त्यात वॉर्ड क्रमांक २९ मधील ठेकेदार त्यांच्याकडील सफाई कामगारांना करारानुसार पगार देत नसल्याचे आढळून आले असून, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की वॉर्ड क्रमांक २९ मधील बिजासनी महिला बचत गटाला हा ठेका दिला आहे. ठेकेदाराकडून कामगारांना कमी रोजंदारी दिली जात आहे. तसेच कामगारांना दमबाजीही केली जात असून या ठेकेदारांची चौकशी करून योग्य कारवाई करावी, कामगारांना मागील फरकासह तरतुदीनुसार वाढीव मंजुरी मिळावी, अशा मागण्या जिल्हाधिकारी, आयुक्त तसेच महापौरांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. 

महापौरांनी पदाचा राजीनामा द्यावा
प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलनाचा धडाका लावला. परंतु महापौर नितीन लढ्ढा यांनी शहरातील राजकीय दबावाखाली केवळ शहरातील चौकांची नावे बदलण्याचे काम केले. विविध निधीतून कामे निकृष्ट झाली असून, याकडे महापौरांनी जाणूनबुजून लक्ष दिले नाही. प्रभारी आयुक्तांनी अल्पावधीत जी कामे केली, ती महापौरांना जमली नाही. त्यामुळे त्यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विष्णू घोडेस्वार यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Web Title: jalgaon news municipal corporation

टॅग्स