महापौरपदाची सात सप्टेंबरला होणार निवड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

जळगाव - खानदेश विकास आघाडीचे नितीन लढ्ढा यांनी महापौरपदाचा राजीनामा २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे दिला. त्यानुसार रिक्त झालेल्या महापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी आज जाहीर केला. त्यानुसार ७ सप्टेंबरला विशेष महासभेत महापौरपदाची निवड होणार असून त्यासाठी मंगळवारपासून (ता.२९) अर्ज उपलब्ध होणार आहेत तर पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

‘खाविआ’चे नेते सुरेशदादा जैन यांच्या आदेशावरून महापौर लढ्ढा यांनी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्तांकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी महापौरपदाच्या निवडणूक कार्यक्रमबाबतचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना पाठविला होता. या प्रस्तावावरून आज महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी परिपत्रक काढून जाहीर केला आहे. यात विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केली आहे. त्यानुसार मंगळवारपासून अर्ज घेण्याची तसेच पाच सप्टेंबरपर्यंत दुपारी बारापर्यंत नगरसचिव विभागाकडे अर्ज भरता येणार आहे. तर ७ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता सभा सुरू होईल. यात पंधरा मिनिटे माघारीसाठी दिली जातील. त्यानंतर महापौरपदाची निवड घोषित केली जाणार आहे.  

निवडणूक बिनविरोध होणार का? 
उपमहापौर ललित कोल्हे यांना महापौरपद देण्यासाठी पदाचा लढ्ढा यांनी राजीनामा दिला. त्यानुसार ललित कोल्हे या पदाचे मुख्य दावेदार असणार आहे. या पदासाठी भाजप आपला उमेदवार देईल का, याबाबत देखील अजून स्पष्ट नाही. त्यात कोल्हेंना मंत्री गिरीश महाजन, तसेच खाविआचा पाठिंबा असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. 

पुढील काळ पदाधिकारी निवडीचा
ललित कोल्हे महापौर झाल्यास उपमहापौरपद हे रिक्त होणार आहे. त्यापाठोपाठ स्थायी समितीच्या सभापती डॉ. वर्षा खडके व महिला-बालकल्याण समितीच्या सभापती कांचन सोनवणे यांचा कार्यकाळ संपणार असल्याने येत्या एक-दीड महिन्यात महापालिकेत पदासाठी निवडणुका होऊन मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत.

Web Title: jalgaon news municipal corporation