भडगाव पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडून सेनेकडे

सुधाकर पाटील
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

अडीच वर्षात दोनदा नगराध्यक्षाची निवड झाली. त्यात  राजेंद्र पाटील यांना दोन्ही वेळेस राष्ट्रवादीकडुन पराभवला सामोरे जावे लागले. मात्र तिसर्यादा त्यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. त्यांच्या विजयाने भडगाव तालुक्याची सत्ताकेंद्र सेनेकडे आल्याचे चित्र आहे. पंचाईत समिती, बाजार समीती, नगरपालिका, शेतकरी सहकारी संघ हे सेनेच्या ताब्यात आहेत

भडगाव - अडीच वर्षापासुन राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पालिकेची सत्ता शिवसेनेला आपल्याकडे खेचुन आणण्यात यश आले आहे. नगराध्यक्षपदि सेनेचे राजेंद्र पाटील तर उपनगध्यक्ष म्हणून करूणा देशमुख यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक गैरहजर राहीले.  

नगराध्यक्षपदाची अडीच वर्षाची मुदत संपल्याने नगराध्यक्षाची निवड झाली. त्यात सेनेचे राजेंद्र पाटील यांना अकरा तर राष्ट्रवादीच्या सुवर्णा पाटीलांना आठ मते मिळाले. राष्ट्रवादी काॅग्रेसचे सुभाष पाटील व वैशाली महाजन हे नगरसेवक वैद्यकीय कारणाने गैरहजर राहीले. 

सकाळी अकरा वाजता पिठासीन अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. राजेंद्र पाटील यांना सेनेचे नऊ तर भाजप अपक्ष प्रत्येकी एक अश्या 11 नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. तर सुवर्णा पाटील यांना राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांनी मतदान केले. उपनगरध्यक्ष पदासाठी सेनेकडून करूणा सुनिल देशमुख यांनी तर राष्ट्रवादीच्या वतीने योजना पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले. उपनगरध्यक्ष निवडणूकीत नगराध्यक्षनिवडणूकीसारखेच मते  सेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली. त्यामुळे उपनगरध्यक्षपदी सेनेच्या करूणा देशमुख विजयी झाल्या. यावेळी सुशिला पाटील, अतुल पाटील, वसिम मिर्झा, रंजना पाटील, अमोल पाटील, संजय भिल, सुवर्णा शाम पाटील, कल्पना भोई, भिकनुर पठाण, यावेळी देशमुख, राजेंद्र देशमुख, प्रशांत पवार, जाकेराबी मलिक, शामकांत भोसले हे नगरसेवक उपस्थित होते. 
 
निवडणूकीनंतर मिरवणूक
निवडणूकीनंतर शिवसेनेच्या वतीने गुलाल उधळुन फटाके फोडुन जल्लोष करण्यात आला. निवडीनंतर आमदार कीशोर पाटील , माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र पाटील व उपनगरध्यक्षा करूणा देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, तालुकाप्रमुख दिपक पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, माजी जिल्हा परीषद सदस्य विकास पाटील, बाजार समीतीचे माजी सभापती अॅड दिनकर देवरे, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख,  पंचायत समीती सदस्य रामकृष्ण पाटील, बात्सरचे संजय पाटील, वडध्याचे युवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाप्रमुख इम्रानअली सैय्यद,  स्विकृत नगरसेवक सचिन चोरडीया, शामकांत पाटील,  प्रदिप महाजन,  अजबराव पाटील, जगन भोई, रविंद्र पाटील, सुनील गोकल आदि उपस्थित होते. 

तिसर्या प्रयत्नांत राजेंद्र पाटील नगरध्यक्षपदी
अडीच वर्षात दोनदा नगराध्यक्षाची निवड झाली. त्यात  राजेंद्र पाटील यांना दोन्ही वेळेस राष्ट्रवादीकडुन पराभवला सामोरे जावे लागले. मात्र तिसर्यादा त्यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. त्यांच्या विजयाने भडगाव तालुक्याची सत्ताकेंद्र सेनेकडे आल्याचे चित्र आहे. पंचाईत समिती, बाजार समीती, नगरपालिका, शेतकरी सहकारी संघ हे सेनेच्या ताब्यात आहेत.

Web Title: Jalgaon news: ncp shiv sena