जळगावचा पुढचा महापौर शिवसेनेचाच - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जळगाव - जळगाव महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वत:च्या ताकदीवर ‘धनुष्यबाणा’च्या चिन्हावरच लढणार आहे. पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की शिवसेना महापालिकेची निवडणूक ‘धनुष्यबाण’ चिन्हावरच लढणार आहे, यात कोणताही बदल होणार नाही. अनेक आघाड्या आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. जळगावचा पुढचा महापौर हा शिवसेनेचाच असेल. 

सुरेशदादांसोबतच शिवसेना 
माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्याबाबत ते म्हणाले, की त्यांची आपण उद्या (१२ जानेवारी) वैयक्तिक भेट घेणार आहोत. ते शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासोबतच आम्ही आहेत. त्यांना विचारात घेतल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही.

जळगावचा खासदार शिवसेनेचाच 
जळगाव जिल्ह्यात आगामी निवडणुकांबाबत ते म्हणाले, की जिल्ह्यात शिवसेना खंबीरपणे लढणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकाही स्वतंत्रपणे लढण्याची शिवसेनेची तयारी आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. लोकसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो तरी जळगावचा खासदार हा शिवसेनेचाच असेल. एवढी आमची ताकद आता निश्‍चित आहे. रावेरबाबत आम्ही नंतर विचार करू.

Web Title: jalgaon news next mayor shivsena