ट्रान्सफॉर्मरला '407'ची धडक, ऑईलची गळती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

आज (ता.29) दुपारी जळगावात आलेल्या मेटॅडोअर (एमएच 02, एक्‍सए 2567) रस्त्याच्या मधोमध असलेल्या ट्रान्सफार्मरला धडक दिली.

जळगाव : शहरातील घाणेकर चौक परिसरातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या ट्रान्सफॉर्मरला 407 मेटॅडोअरने धडक दिल्याने ऑईल टाकी लिकेज झाल्याने पाण्याच्या फोर्सप्रमाणे ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलला गळती लागली होती. यामुळे परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला होता. 

शहरातील शिवाजीरोड परिसरात फळ विक्रेत्यांच्या गाड्या रस्त्यावर लागत असतात. शिवाय, टावर चौकाकडून शनिपेठकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. कायम गर्दी राहत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने मोठी वाहने निघणे देखील शक्‍य नसते. परंतू, आज (ता.29) दुपारी जळगावात आलेल्या मेटॅडोअर (एमएच 02, एक्‍सए 2567) रस्त्याच्या मधोमध असलेल्या ट्रान्सफार्मरला धडक दिली.

मेटॅडोअरचा वरचा हुक ऑईलच्या टाकीत अडकल्याने टाकीला गळती लागली होती. लिकेज मोठे असल्याने मोटरद्वारे चालणाऱ्या पाण्याच्या फोर्सप्रमाणे ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल रस्त्यावर पडत होते. यावेळी अनेक व्यापारी व नागरीकांनी गळणारे ऑईल घेण्यासाठी बादली, पिशव्या घेवून गर्दी करत होते

Web Title: jalgaon news oil leakage accident transformer