नरेंद्र मोदींच्या प्रतिमेस पेट्रोलचा अभिषेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

जळगाव - ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, अशा घोषणा देत काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर त्वरित कमी करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  
राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल दरवाढीचा निषेध म्हणून चक्क दुचाकी लोटगाडीवर ठेवण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या प्रतिमेला हळद -कुंकू वाहून, पेट्रोल व डिझेलचा अभिषेक करण्यात आला. 

‘भाजप सरकार स्वाहा’, ‘मोदी सरकार स्वाहा’, असा मंत्रही म्हणण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

सरकारच्या निषेधार्थ निवेदन
पक्षातर्फे सरकारच्या निषेधार्थ निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना देण्यात आले. इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील म्हणाले की, शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘अच्छे दिन’चे दाखविलेले स्वप्न पूर्णपणे फोल ठरले आहे. सरकारने जर हे दर त्वरित कमी केले नाहीत, तर पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी जिल्हा महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, जिल्हा महानगर कार्याध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरी, तालुकाध्यक्ष संजय वराडे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: jalgaon news Petrol Abhishek of Narendra Modi's image