खाकी'च्या सहृदय तत्परतेने  "लाइनमन'चा वाचला जीव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

खाकी'च्या सहृदय तत्परतेने 
"लाइनमन'चा वाचला जीव 

खाकी'च्या सहृदय तत्परतेने 
"लाइनमन'चा वाचला जीव 

जळगाव  : पोलिसांबद्दल आजही सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रतिमा हवी तशी चांगली नाहीच. मात्र, प्रत्येकालाच वाईट अनुभवाला सामोरे जावे लागते असे नाही. नेहमीच दरडावणाऱ्या खाकीतील रांगडा जवान संवेदनशीलही असतो, याचा प्रत्यय नुकताच आला. ईच्छादेवी चौकात हृदयविकाराचा झटका येऊन चौकात कोसळलेल्या वीज मंडळातील लाइनमन विजय एकनाथ टोकरे (रा. निंभोरा) यांना बंदोबस्तावर तैनात पोलिसांसह निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी तत्काळ मदतीला धाव घेत रुग्णालयात रवाना केले. वेळीच उपचार मिळाल्याने टाकरे यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असून, टोकरे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे. 
निंभोरा येथील विजय टोकरे हे रहिवासी आहेत. जळगाव शहरातील आदर्शनगर युनिटमध्ये असिस्टंट लाइनमन म्हणून कार्यरत आहेत. ते नियमित निंभोरा ते जळगाव ये-जा करतात. नेहमीप्रमाणे विजय हे रविवारी सकाळी दहाला ईच्छादेवी चौकात चारचाकी वाहनातून उतरले. परंतु, वाहनातून उतरताच त्यांना चक्कर येण्यास सुरवात झाली व ते बाजूच्या तरुणाचा हात पकडून खाली बसले. त्यांनी प्रकृती बिघडत असून, त्वरित पोलिसांना बोलवा सांगितले. याचवेळी अयोध्या निकाल व ईद-ए-मिलादनिमित्त एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ व क्‍यूआरटी पथक हे इच्छादेवी चौकात तैनात होते. शिरसाठ यांना टोकरे रस्त्यावर पडल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लाइनमन टोकरे यांना क्‍युआरटी पथकाच्या मदतीने खासगी वाहनातून खासगी रुग्णालयात हलविले. 

पोलिसांचे मानले आभार 
दरम्यान, चक्कर येऊन कोसळल्यानंतर लाइनमन विजय टोकरे यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतल्यानंतर वाहन येण्याआधी पोलिस प्रशिक्षणात मिळालेल्या उपचार पद्धतीचा वापर करून टोकरे यांची प्रकृती बरी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, असे पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी सांगितले. पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे विजय टोकरे यांना एकप्रकारे जीवनदान मिळाले. आता टोकरे यांची ठणठणीत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news polis -help-lainman-save-life