वीज प्रश्न सुटत नसल्याने आमदारांचे उद्यापासून उपोषण

सुधाकर पाटील
रविवार, 30 जुलै 2017

उद्या सकाळी 11 वाजेपासुन विधानभवनाच्या पायर्यावंर मतदार संघातील वीज समस्यांबाबत उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. 
- किशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव

भडगाव : तालुक्यातील वीज प्रश्न सुटत नसल्याने आमदार किशोर पाटील हे उद्या ( ता. 31) ला विधानभवनाच्या पायऱ्यांवंर उपोषणाला बसणार आहेत. तालुक्यासाठी 132 के.व्ही. वीज सबस्टेश मंजुर करण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. 

तालुक्यात 132 के.व्ही. वीज सबस्टेशन नसल्याने काही वर्षापासुन वीजेचा प्रश्न गंभीर बनला आहेत. त्यामुळे तालुक्यात 132 के.व्ही. सबस्टेशन काऱ्यांन्वित व्हावे अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे.  त्यानुसार 2009 मधे यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला.  2010 सबस्टेशनला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कोठली शिवारातील 10 एकर जागाही वीज कंपनीने रक्कम भरून ताब्यात घेतली. मात्र प्रत्यक्षात सबस्टेशनच्या कामाबाबत वीज कंपनी चलढकल करत आहे. आमदार किशोर पाटील यांनी या विषयाचा पाठपुरावा करत आतापर्यंत मुबंईला मंत्ऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांच्या 8 बैठका घेण्यात आल्या आहेत. मात्र तरीही 132 के.व्ही. सबस्टेशन बाबत वीज कंपनीचे अधिकारी हालचाल करायला तयार नाहीत.
तालुक्यात सबस्टेशन नसल्याने शेतकऱ्यांना पुरेसे होल्टेज मिळत नाही. पऱ्यांयाने उपकरण जळुन आर्थिक नुकसान होतेच शिवाय पिकांना  पाण्याचे आवर्तन द्यायला अडचण येते. त्यामुळे तालुक्यात 132 के.व्ही. सबस्टेशन होणे आवश्यक आहे. असे आमदार किशोर पाटील यांचे म्हणणे आहे. शिवाय वीज तार ही जिर्ण झाल्याने मोठे अपघात होतात. त्यामुळे जिर्ण तार ही बदलविण्यात यावेत. कर्मचाऱ्यां रिक्त जागा भरण्यात याव्यात. आदि त्यांच्या मागणी आहेत. या मागणीच्या पुर्ततेसाठी आमदार किशोर पाटील उद्या पासुन विधानभवनाच्या पायऱ्यांवंर वीज कंपनीच्या विरोधात ते उपोषणाला बसणार आहेत. तर त्यांना पाठींबा म्हणून तालुक्यात ही शिवसेनेच्या वतीने विविध आदोलंनाची आखणी करण्यात येणार आहे.

सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
महाराष्ट्रतला भडगाव असा एकमेव तालुका असावा की तेथे अद्याप वीजेचे सबस्टेशन नाही. सबस्टेशन नसल्याने तालुक्याला पाचोरा, चाळीसगाव, पारोळा तालुक्यातील 132 के.व्ही. सबस्टेशनवरून वीज पुरवठा होतो. त्यांचे अंतर जास्त असल्याने लाॅसेस होण्याचे प्रमाण अधिक होते. पऱ्यांयाने कमी दाबाने वीज मिळत असते. त्यामुळे तालुक्याचा वीज प्रश्न निकाली काढण्यासाठी 132 के.व्ही. सबस्टेशन होणे हाच पऱ्यांय आहे. हाच मुद्दा घेऊन आमदार किशोर पाटील उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची  तालुकावासीयांना अपेक्षा आहे. 

 

Web Title: jalgaon news power load shedding issue mla fast