‘वॉटर पॉइंट’द्वारे थंड पाण्याने भागतेय तृष्णा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

जळगाव - उन्हाच्या तीव्र झळा, त्यात प्रवास म्हटला की घशाला कोरड पडतेच. तहान भागविण्यासाठी थंडगार पाण्याचा शोध स्टेशन आले की प्रवाशांकडून सुरू होतो किंवा गाडीतच विक्रीला येणाऱ्या पाण्याच्या बाटल्या घेऊन तहान भागविली जाते. पण, जळगाव रेल्वेस्थानकावर गाडी थांबली की, येथे उभारण्यात आलेल्या ‘वॉटर पॉइंट’ या मिनरल वॉटरच्या मशिनजवळ पाणी घेण्यासाठी गर्दी होते. स्वस्त आणि थंड पाण्याने प्रवाशांची तृष्णा भागत आहे.

रेल्वेस्थानकात आल्यानंतर शुद्ध मिनरल वॉटरची बाटली विकत घ्यायची म्हटली तर प्रवाशांना किमान २५ ते ३० रुपये मोजावे लागतात. पण प्रवाशांना कमी पैशांत शुद्ध आणि थंड पाणी देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेत ‘वॉटर पॉइंट’ मशिन उभारण्यात आले आहे. 

पाच रुपयांत एक लिटर पाणी
रेल्वेने प्रवास करताना काही प्रवासी घरूनच पाणी आणतात. पण लांबच्या प्रवासात घरून आणलेले पाणी उन्हाळ्यात गरम होत असल्याने त्या पाण्याने तहान भागत नाही. यामुळे अनेक प्रवासी रेल्वेस्थानकात असलेले ‘प्याऊ’ (पिण्याच्या पाण्याचे नळ) येथून बाटली भरून तहान भागवत असतात. तर बहुतांश प्रवासी हे शुद्ध आणि थंड पाण्याच्या दृष्टीने मिनरल वॉटरची बाटली विकत घेतात. यासाठी प्रवाशांना किमान तीस रुपये मोजावे लागतात. परंतु स्वस्त दरात ‘मिनरल वॉटर’ उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) पुढाकार घेत रेल्वेस्थानकांत शुद्ध पाण्याचे केंद्रही सुरू केले. याठिकाणाहून प्रवाशांना पाच रुपयात एक लिटर थंडगार पाणी उपलब्ध होत आहे. 

प्रवाशांची गर्दी
जळगाव रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोन आणि तीनवर दोन- दोन असे चार ‘वॉटर पॉइंट’ मशिन लावण्यात आले आहे. या मशिनमधून कायम थंड पाणी उपलब्ध असल्याने हजारो प्रवाशांना थंडगार पाण्याचा उपयोग होत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर गाडी थांबल्या- थांबल्या मशिनवर गर्दी होत आहे.

विक्रेत्यांकडून मिनरल वॉटरच्या नावाने लूट
रेल्वे प्रवासात फलाटावर किंवा गाडीमध्ये एक- एक लिटरच्या गार पाण्याच्या बाटल्या विक्री करणारे पाहण्यास मिळतात. परंतु पाणी विक्रेत्यांकडून मिनरल वॉटरच्या नावाखाली प्रवाशांची फसवणूक केली जात आहे. कारण प्रवाशांनी फेकलेल्या बाटल्या उचलून त्यात साधे पाणी भरायचे आणि त्यावर प्लास्टिक कागद लावून बाटली शुद्ध व थंड पाण्याने भरल्याचे दर्शवून विकण्याचे काम सुरू आहे. या प्रकाराकडे रेल्वे प्रशासनही लक्ष देत नसल्याचे पाहावयास  मिळत आहे.

Web Title: jalgaon news railway station water point summer