जळगाव शहरात बरसल्या पावसाच्या सरी    

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

जळगाव - मृग नक्षत्र उलटल्यानंतरही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. जूनच्या सुरवातीला झालेल्या थोड्या पावसानंतर वीस दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने काल दुपारी काही भागात दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पावसाची असलेली प्रतीक्षा संपली असली, तरी देखील जिल्ह्यात चांगल्या दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस गायब झाला होता. पेरण्या केल्यानंतर त्यावर पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. गेल्या काही दिवसांपासून काळेकुट्ट ढग आकाशात जमा व्हायचे परंतु पाऊस हुलकावणी देत होता. आज देखील सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळी अकराच्या सुमारास बारीक तुरळक पाऊस काही ठिकाणी झाला. मात्र, दुपारी तीन- साडेतीनच्या सुमारास काही भागात जोरदार पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. 

काहींनी घेतला भिजण्याचा आनंद
शहर व परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा असताना काल दुपारी जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. साधारण दहा- पंधरा मिनीट पावसाच्या सरी जोरदार बरसल्याने शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले होते.

दुकानात, घरात पाणी 
दमदार झालेल्या पावसामुळे इच्छादेवी ते श्‍यामा फायर रोड वर दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरले. तसेच मोहाडी रस्त्यावरील नयनतारा गेस्ट हाउस जवळ पावसाच्या पाण्याने गटारी तुंबल्या. गटारी स्वच्छता व्यवस्थित न झाल्याने हे पाणी साचलेले असल्याचा आरोप नागरिकांना केला आहे. 

वीजपुरवठा खंडित
शहरातील काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच किसनराव नगरातील डीपी जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणतर्फे दुरुस्तीचे काम होती घेऊन वीजपुरवठा सायंकाळी सातच्या सुमारास सुरळीत करण्यात आला. 

Web Title: jalgaon news rain

टॅग्स