रावणदहनाची तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

जळगाव - विजयादशमीच्या मुहूर्तावर मेहरुण चौपाटीवर उद्या (३० सप्टेंबर) सायंकाळी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेसहाला हा सोहळा होईल. एल. के. फाउंडेशनतर्फे कार्यक्रम होत आहे.

दरवर्षाप्रमाणे यंदाही एल. के. फाउंडेशनतर्फे रावणदहनाचा सोहळा आगळावेगळा व भव्य स्वरूपात करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून मेहरुण चौपाटीवर सुरू असलेली तयारी पूर्णत्वाकडे आहे. उद्या सायंकाळी साडेसहाला मेहरुण चौपाटीवर ‘लंकानगरी’त होणाऱ्या रावणदहनाच्या सोहळ्यापूर्वी फटाक्‍यांची आकर्षक आतषबाजी करण्यात येईल. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावणदहन होईल. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह महापालिकेतील गटनेते, नगरसेवक आदी उपस्थित राहतील.

शिरसोली मार्गावर बंदोबस्त
दरवर्षी मेहरुण चौपाटीवर रावणदहनाचा कार्यक्रम होत असल्याने प्रचंड गर्दी होते. हा सोहळा पाहण्यासाठी शहरासह विविध भागांतून नागरिक येतात. या पार्श्‍वभूमीवर या परिसरात उद्या दुपारी तीनपासून पुरेसा बंदोबस्त राखण्यात आला आहे. स्वत: पोलिस अधीक्षकांसह अप्पर अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह विविध पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वाहतूक पोलिसही तैनात असतील.

Web Title: jalgaon news ravandahan preparation complete