महागाईमुळे रिक्षाभाड्यातही वाढ हवी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

जळगाव - गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात चढ-उतार होत आहेत. महागाईही गगनाला भिडत आहे. अशा स्थितीत रिक्षाचालकांची आर्थिक कोंडी होत आहे. यामुळे रिक्षाच्या भाडे दरात वाढ करावी, अशी मागणी आज येथे झालेल्या रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या बैठकीत रिक्षा चालकांनी केली असल्याची माहिती अध्यक्ष शांताराम अहिरे यांनी दिली.

रेल्वेस्थानक परिसरात आज दुपारी रिक्षाचालकांची बैठक झाली. यावेळी रिक्षाचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बैठकीस इस्माईल शहा, जितेंद्र अहिरे, मुन्ना अली, देविदास कोळी यासह अनेक रिक्षाचालक व मालक उपस्थित होते. सध्या प्रती प्रवासी विविध टप्प्याचे भाडे दहा रुपये आकारण्यात येते. हे आजच्या स्थितीत कमी असून यात पाच रुपये वाढवून मिळावे. १५ रुपये प्रतिसिट भाडे मिळावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.

खराब रस्त्यांमुळे इंधन जास्त 
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्यांच्या नावे बोंब आहे. अनेक ठिकाणचे रस्ते खराब झालेले आहेत. दसरा, दिवाळीपूर्वी महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र, ते करण्यात आलेले नाही. रस्ते खराब असल्याने रिक्षाचालकांना गिअर बदलावा लागतो. यात इंधन जास्त लागते. वाढलेल्या दरामुळे इंधन परवडत नाही. रिक्षा खराब होतात. यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली.

Web Title: jalgaon news rickshaw rent increase by dearness