वडजी जिल्हा परीषद शाळेत जवानाच्या हस्ते झेंडावंदन

सुधाकर पाटील
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

भडगाव (जळगाव) : गेल्या वर्षी वडजी ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन सैनिकाच्या हस्ते केले होते. तिच परपंरा कायम ठेवत जिल्हा परीषद शाळेचे प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन सैनिकाच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वडजीई ग्रामपंचायतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गेल्या वर्षी वडजी (ता. भडगाव) ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिनाचे झेंडानंदन देशाची सेवा करणार्या सैनिकाच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे धर्तीवर येथील जिल्हा परीषद शाळेत यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन गावातील सैनिक असलेला तरूण राहूल संजय पाटील यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला. राहूल पाटील हे सध्या काश्मिर मधे बारामुला येथे कार्यरत आहेत. सध्या राहूल पाटील सुट्टीवर आलेले आहेत. वडजी ग्रामपंचायतीनंतर जिल्हा परीषद शाळेने सैनिकाच्या हस्ते झेडावंदन करण्याची परपंरा कायम ठेवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सैनिकाचे देशासाठीचे योगदान खुप मोठे असून, त्यातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरपंच प्रतिभा वाघ यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

Web Title: jalgaon news soldier flag at Wadji Zilla Parishad School