टोळीकडून मागणीनुसार दुचाकींच्या स्पेअर पार्टचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

जळगाव - गुन्हे शाखेने भुसावळ येथील घरफोड्यांप्रकरणी अटक केलेल्या ‘टेके शाब्बास’ टोळीचा गुन्हेगारीचा पायाच मुळात ‘ब्रँडेड’ बुटांच्या चोरीने रचल्याची माहिती समोर येत आहे. बाजारपेठेत दुचाकीसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टस्‌सह सुटे भाग (ॲसेसरीज) मागणीनुसार पुरवठा करण्याचा धडाकाही या टोळीने लावला. या चोऱ्यांसह अनेक घरफोड्या त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकातील रवींद्र पाटील यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून ‘टेके शाब्बास’ टोळीला अटक करण्यात आली.

जळगाव - गुन्हे शाखेने भुसावळ येथील घरफोड्यांप्रकरणी अटक केलेल्या ‘टेके शाब्बास’ टोळीचा गुन्हेगारीचा पायाच मुळात ‘ब्रँडेड’ बुटांच्या चोरीने रचल्याची माहिती समोर येत आहे. बाजारपेठेत दुचाकीसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टस्‌सह सुटे भाग (ॲसेसरीज) मागणीनुसार पुरवठा करण्याचा धडाकाही या टोळीने लावला. या चोऱ्यांसह अनेक घरफोड्या त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकातील रवींद्र पाटील यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून ‘टेके शाब्बास’ टोळीला अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिस पथकाने या टोळीची एकूणच कारकीर्द व गुन्ह्याची पद्धती (मोडस्‌ ऑपरेंडी) तपासली असता तिघी-चारही मित्र रेल्वे विभागाच्या नॉर्थ कॉलनी, पंधरा बंगला, चाळीस बंगला, पियुष कॉलनी आदी उच्चभ्रू वसाहत आणि अधिकाऱ्यांच्या घराचे कंपाउंड ओलांडून दारावरील ब्रॅण्डेड बूट चोरी करून विकत होते. त्यानंतर अपार्टमेंटमधील वाहनांच्या पेट्रोलची चोरी केली. गणेश मंडळासाठी टी-शर्ट लागतील म्हणून रेडिमेडचे दुकान फोडले. काही घरात किरकोळ चोऱ्या केल्या, तरी पोलिसांचे लक्ष जात नाही. दाखल गुन्ह्यात अटक होत नसल्याने चोरट्यांची हिंमत वाढून त्यांनी भुसावळ शहर व परिसरातील दुकाने आणि घरफोड्यांना सुरवात केली होती. खास करून रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थाने, बंगले या चोरट्यांचे रडारवर असल्याने नेहमीच्या त्रासाला कंटाळून रेल्वे विभागाने आपल्या कॉलनीच्या चारही बाजूला भिंतीचे कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला.

मागणीनुसार स्पेअर पार्ट पुरवठा
इतर चार- पाच तालुक्‍यांना जोडणारा आणि रेल्वेचे जंक्‍शन असलेल्या भुसावळ तालुक्‍यात इतर बाजारपेठांसह चोरबाजार, भंगार बाजारही मोठ्या प्रमाणावर आहे. दुचाकी चार चाकी वाहनांना आवश्‍यक असणारे सुटेभाग मिळवून देण्याची मोठी बाजारपेठ या टोळीला भुसावळमध्येच उपलब्ध झाली होती. बाजारात अधिक मागणी असलेल्या वाहनाच्या चाकापासून ते थेट इंजिन चेसीस उपलब्ध करून देण्याची या चोरट्यांची क्षमता असल्याने वाहनचोरीचे असंख्य गुन्हे उघडकीस येणार आहे. वाहन चोरून आणल्यावर रेल्वे कर्मचारीपुत्र अभिषेक भालेराव याच्या घरामागील नाल्याच्या जागेवर वाहन तोडण्यात येऊन त्याचे स्पेअरपार्ट विक्री करण्यात येत असल्याची माहिती पथकाने दिली आहे. अटकेतील पाच संशयितांपैकी दोन रेल्वे कॉलनीजवळील झोपडपट्टीतील रहिवासी असून तिघेही रेल्वे क्वॉर्टरमधील रहिवासी कर्मचाऱ्यांचे पाल्य आहेत.

Web Title: jalgaon news Supply of spare parts for bicycle by demand from gang