जळगाव: पाऊस नसल्याने चौदापैकी नऊ लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट

दीपक कच्छवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

सद्यस्थितीत कोरडेठाक असलेले प्रकल्प
चाळीसगाव तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे हातगाव 1 खडकीसिम, कृष्णापुरी, पिंप्री, उंबरहोळ, ब्राम्हणशेवगे, , कुंझर 2 बोरखेडा, देवळी, भोरस पथराड ह्या प्रक्लपात पाण्याचा एक थेंबही नाही.सप्टेंबर महीन्यापर्यत ही परीस्थिती असल्याने पुढे काय होणार ? याची चिंता शेतकर्याना लागली आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळाची दाहकता तीव्र झाली आहे. सप्टेंबर महीना सुरू असुन देखील चौदा प्रकल्पापैकी एकच प्रकल्प आतपर्यंत शंभर टक्के भरला आहे. चौदा प्रकल्पापैकी पाच प्रकल्पात किरकोळ पाणीसाठा असुन नऊ प्रकल्पात ठणठणाट असल्याने भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहे.

पावसाळा संपून दोन महीने होत आहे.स्पटेबंर महिन्याचे दहा दिवस वरती झाले. तरी तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने चौदाही प्रकल्प शंभर टक्के भरले होते.मात्र या प्रक्लपातुन पाण्याची चोरी झाल्याने हे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. यावर्षी सुरवातीला नाशिक जिल्ह्य़ात चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणात ६२ टक्के भरले आहे.

पाण्याचा प्रश्न गंभीर होणार
या चौदा प्रकल्पातील (वाघळा 1 १००%) (पिंपरखेड ९%) वाघळा 2 १९%) (वलटान ३६.६३%) (राजदेहरे ७.६७%) या पाच प्रक्लपातील वाघळा 1 हा एकमेवच प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. तर उर्वरित चार लघु प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत आहे. काही भागात अजुनही शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहे.

मेहुणबारे जवळच्या खडकीसिम  बंधार्याच्या सांडव्याची यापुर्वी दुरूस्ती केली मात्र पाहीजे तशी दुरूस्ती झाली नसल्याने या प्रकल्पात पाणि गळती होत असते.सध्या यामध्ये शुन्य टक्के पाणीसाठा आहे. तरी देखिल याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. वरखेडे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णापुरी प्रकल्पाचे तेच रडगाणे आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गेटजवळच गळती आहेत त्यामुळे हा प्रकल्प भरल्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असते. त्याच बरोबर या ठीकाणी पाणि चोरी देखील होत असल्याने शंभर टक्के भरलेला प्रकल्प आता कोरडेठाक पडला आहे. त्यामुळे या प्रकल्पावर शासनाने लक्ष देवुन पाण्याच्या चोर्यावर नियंत्रण आणावे आशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. चाळीसगाव तालुक्यात लघुपाटबंधारे तलावांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व लघुप्रक्लप कोरडेठाक झाले आहेत. बोरखेडा तलावाला दोन दरवाजे असुन या दरवाजाचेही पत्रे सडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते.या प्रक्लपावर देखील पाण्याची चोरी होत असते बर्याच वेळा शेतकरी यांनी या पाण्याच्या होणारी चोरी संदर्भात लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार करून देखील काही एक उपयोग होत नाही.तरी या प्रकल्पाची दुरूस्ती करून भविष्यात  होणारी पाणी चोरी रोखावी अशी मागणी होत आहे.

सद्यस्थितीत कोरडेठाक असलेले प्रकल्प
चाळीसगाव तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे हातगाव 1 खडकीसिम, कृष्णापुरी, पिंप्री, उंबरहोळ, ब्राम्हणशेवगे, , कुंझर 2 बोरखेडा, देवळी, भोरस पथराड ह्या प्रक्लपात पाण्याचा एक थेंबही नाही.सप्टेंबर महीन्यापर्यत ही परीस्थिती असल्याने पुढे काय होणार ? याची चिंता शेतकर्याना लागली आहे.

Web Title: Jalgaon news water storage in dams