चाळीसगाव: 'गिरणा' 70 टक्के; 'मन्याड' 58 टक्के

शिवनंदन बाविस्कर
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

मन्याड धरणात 58 टक्के साठा...
​मन्याड धरणात आज सकाळपर्यंत एकूण एक हजार 311 दशलक्ष घनफुट साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरण 58.26 टक्के भरले आहे. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा धरणाचा साठा आज सकाळी 70 टक्क्यांवर, तर मन्याडचा साठा 58 टक्क्यांवर गेला असल्याची माहिती धरणाच्या अधिकाऱ्यांनी 'सकाळ'ला दिली आहे.

गिरणा धरणात सुरू असलेली आवक सध्या कमी झाली आहे. आज सकाळी धरणाचा साठा एकूण 16 हजार 8 दशलक्ष घनफुट झाला असून 13 हजार 8 दशलक्ष घनफुट जिवंत साठा निर्माण झाला आहे. यामुळे धरण 70.32 टक्के भरले आहे. अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

मन्याड धरणात 58 टक्के साठा...
मन्याड धरणात आज सकाळपर्यंत एकूण एक हजार 311 दशलक्ष घनफुट साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरण 58.26 टक्के भरले आहे. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

Web Title: Jalgaon news water stroage in Girna Dam