चाळीसगाव: मेहुणबारेत 'लांडगा आला रे आला'

दीपक कच्छवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

'लाडंगा आला रे आला...'
येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकुळाच्या  बातम्या ऐकायला येत आहे. परंतु बिबट्या या भागात नसल्याने त्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे. सध्या तरी  येथे पिसाळलेला लाडंग्याने धुमाकूळ घातला असून एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यत 'लाडंगा आला रे आला...' अशीच चर्चा सुरू होती.

मेहुणबारे(ता. चाळीसगाव) : परिसरात आधीच बिबट्याचे थैमान सुरू असताना आता त्यात लांडग्यांने धुडघुस घातला.असुन सुमारे 60 पेक्षा अधिक गुरांना लांडग्यांने चावा घेवुन जखमी केल्याची घटना आज भऊर, धामणगाव, शिदवाडी, जामदासह परिसरात घडली.यामुळे आज दिवसभर लांडगा आला रे आला... अश्या बातम्याचा ऊत आला होता. बिबट्याच्या सावटाखाली असलेले ग्रामस्थ आता लांडग्यांच्या भीतीने कमालीची धास्तावले आहेत.

येथील बसस्थानकापासुन दोन किलोमीटर अंतरावरील राजेंद्र नेमीचंद वाणी याच्या भऊर रस्त्यावरील शेतात आज सकाळी आठ वाजता सर्व गुरे रसत्याच्या कडेला बांधलेले होते. त्यांचा शेतातील कामगार खुशालसिंग पावरा हा त्या ठीकाणी काम करीत असताना आचानक हीस्त्र प्राण्याने एका  बैलावर हल्ला केला. यावेळी  एकच गोधळ उडाला. बैलावर हल्ला करताच त्या प्राण्याने खुशामसिग पावरा याच्यावरही झडप घातली. सुदैवाने पावरा हा जवळच्या बैलगाडीवर चढला व त्याने  आरडाओरडा केली.त्यामुळे त्याचे सहकारी धावत आले. त्यानी त्याला वाचवले.यादरम्यान हीस्त्र प्राण्यालाही पळून लावले.या ठीकाणी बिबट्याचा हल्ला झाला आशी अफवा परिसरात पसरली. 

साठहून अधिक गुरे जखमी 
भऊर शिदवाडी, जामदा , धामणगावसह  भागात जवळपास साठ पेक्षा अधिक  गुरांवर हल्ले केले. पिसाळलेला लाडंगा असल्याचे शेतकर्यानी सांगितले. गुरांच्या पायाला पंजा मारून तसेच चावा घेवुन जखमी केले आहे.शेतकरी गणेश पाटील, समाधान पाटील, शिवाजी पाटील, सुभाष पाटील कौतिक पाटील, नाना पाटील , पुंडलिक वायकर, बापु पाटील माधवराव जगताप, भाऊसाहेब पवार, बालाजी पवार, सूर्यभान पवार, ज्ञानेश्वर जगताप , भावसिंग गायकवाड, पुंडलिक महाजन, विजय पाटील, चैत्रांम पाटील, विजय पाटील, अमोल पाटील, अरूण पाटील, अर्जुन पाटील, संजय पाटील यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या म्हैस, गाय, बैल, आदि शेतकर्यांच्या गुरांना चावा घेतला आहे. या  हाल्याने शेतकर्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी वनविभागाचे मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे यानी पहाणी करून हे ठसे लांडग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांना याविषयी समजुन सांगितले. बिबट्याच्या ठसे कसे असतात या बाबत माहिती दिली. गुरांना  तात्काळ रॅबीजची  लस द्यावी असे सांगुन परिसरात जखमी झालेल्या गुरांची पहाणी केली.यावेळी प्रविण गवारे, वनरक्षक संजय चव्हाण  याच्यासह वनकर्मचारी होते.

'लाडंगा आला रे आला...'
येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकुळाच्या  बातम्या ऐकायला येत आहे. परंतु बिबट्या या भागात नसल्याने त्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे. सध्या तरी  येथे पिसाळलेला लाडंग्याने धुमाकूळ घातला असून एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यत 'लाडंगा आला रे आला...' अशीच चर्चा सुरू होती.

या भागात ज्या शेतकऱ्यांच्या गुरांना पिसाळलेल्या लाडंग्याने चावा घातला आहे. त्या शेतकऱ्यांनी तातडीने चोविस तासांच्या आत रेबिजची लस द्यावी. जेणेकरून आपली गुरे दगावणार किंवा पिसळणार नाहीत. या भागात आढळलेले ठसे बिबट्याचे नसुन लाडंग्याचे आहेत.
- राजेश ठोंबरे, मानद वन्यजीवरक्षक, चाळीसगाव.

बिबट्याच्या भितीने सध्या मजुर शेतात कामाला येत नाहीत. त्यामुळे कपाशी वेचणी कशी करायची हा मोठा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सकाळी शेतात आलेले पंचवीस मजुर आज या लांडग्याच्या भितीने घरी परत गेले. त्यामुळे वनविभागाने या लांडग्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.
- राजेंद्र वाणी, शेतकरी, मेहुणबारे.

Web Title: Jalgaon news wolf hox in chalisgaon