विवाहितेचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू

दीपक कच्छवा
शनिवार, 3 मार्च 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव): वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील विवाहितेचा विहिरीत पाणी काढताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव लांबे येथील दीपाली मंगेश पाटील (वय 19) ही विवाहीता स्वतःच्या शेतात असलेल्या विहिरीवर पाणी काढत होती. पाणी काढतांना पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यु झाला. याबाबत सध्या मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: jalgaon news women dead fall down in well