Jalgaon Monsoon : जळगावात यंदा १०७ टक्के पाऊस; माॅन्सून माघारी, अतिवृष्टी न झाल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा

Monsoon Retreat Brings Relief to Farmers : यंदा सरासरीच्या १०८ टक्के पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान परतीचा पाऊस पुन्हा धुमाकूळ घालेल, असा अंदाज हवामान विभागासह हवामान अभ्यासकांनी वर्तविला होता.
Monsoon

Monsoon

sakal 

Updated on

जळगाव: सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावणारा माॅन्सून आता माघारी परतला आहे. यंदा सरासरीच्या १०८ टक्के पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान परतीचा पाऊस पुन्हा धुमाकूळ घालेल, असा अंदाज हवामान विभागासह हवामान अभ्यासकांनी वर्तविला होता. यादरम्यान किरकोळ पाऊस वगळता कोठेही अतिवृष्टी झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com