Cyber Crime
sakal
जळगाव: धुळे येथील नामवंत फर्ममध्ये अकाउंटंट म्हणून कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय तरुणाला व्हॅट्सॲप ग्रुपवर जोडून गुंतवणुकीचे आमिष देण्यात आले. केलेल्या गुंतवणुकीवर तत्काळ आभासी नफा दाखविण्यात आला. त्यानंतर लिंक पाठवून त्याद्वारे मोठ्या गुंतवणुकीला भाग पाडून चक्क २५ लाख ३० हजार ५०० रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.