Methi Ladoo
sakal
जळगाव: एकीकडे थंडीचा कडाका वाढत असतानाच घराघरांत पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू झाली असून, त्यात मेथीच्या लाडूंना विशेष मागणी वाढली आहे. पौष्टिकता, चव आणि आरोग्यदायी गुणधर्म यांचा संगम असलेले मेथीचे लाडू सध्या घरोघरी बनवले जात असून, त्यांच्या सुगंधाने स्वयंपाकघर दरवळून जात आहे.