

Blind Mother and Child Thrown into Well by Family Members
esakal
जळगाव यावल तालुक्यातील किनगाव येथे अंध असल्यावरून एका २७ वर्षीय अंध महिला आणि तिच्या साडेतीन वर्षांच्या अंध मुलाला विहिरीत ढकलून दिले. या क्रूर कृत्यात बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर सुदैवाने आईचा जीव वाचला आहे. अंध असलेल्या जन्मदाता पिता आणि आजीनेच हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. सुरुवातीला पीडित महिलेने हा अपघात असल्याचे सांगितले होते. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर हा भयानक प्रकार समोर आला.