Jalgaon Airport
sakal
जळगाव: येथील विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध होणार आहे. याबरोबरच दोन महिन्यांपासून बंद असलेली अहमदाबाद सेवाही याच तारखेपासून पुन्हा सुरू होईल. या निर्णयामुळे व्यापारी, उद्योजक, राजकीय प्रतिनिधी आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.