Crime
sakal
जळगाव: माजी महापौर ललित कोल्हे याच्या मालकीच्या ममुराबाद रोडवरील एल. के. फार्म हाउस या ठिकाणाहून अटक करण्यात आलेल्या चारही बंगाली तरुणांसह पाच संशयितांची शनिवारी (ता. ४) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली; तर मुख्य संशयित माजी महापौर कोल्हे आणि त्याचा साथीदार राकेश अगारिया या दोघांना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.