Municipal Election
sakal
शिंदखेडात: नगरपंचायत निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कलावती माळी यांनी भाजपच्या रजनी वानखेडे यांचा ७९१ मतांनी पराभव केला. नगरसेवक संख्येत भाजप आघाडीवर असला, तरी नगराध्यक्षपद गमावल्याने राज्यातील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेस आणि शिवसेची स्थिती बिकट झाली आहे. नगराध्यक्षपदासह पाच जागा जिंकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांसह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.