अकरावी विज्ञान शाखेच्या २ हजार जागांसाठी ३ हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

आजपासून होणार अर्जांची छाननी; ३ जुलैला पहिली यादी
जळगाव - अकरावीच्या प्रवेशाला गेल्या पाच दिवसांपासून सुरवात झाली असून आज विज्ञान शाखेच्या अर्ज जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. यंदा अकरावी प्रवेशासाठी शहरातील मुख्य पाच महाविद्यालयांत २ हजार १६० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी तब्बल ३ हजार ६२ अर्ज महाविद्यालयांमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, उद्यापासून (ता. ३०) अर्जांची छाननी सुरू केली जाणार आहे.

यंदा शिक्षण विभागातर्फे विज्ञान शाखेचे प्रवेश हे गुणवत्तेनुसार करण्याचे आदेश आल्याने विद्यार्थ्यांना पाच दिवस अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

आजपासून अर्जांची छाननी
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकडून अर्ज जमा झाल्यानंतर शहरातील मू.जे. महाविद्यालय, नूतन मराठा, धनाजीनाना, बेंडाळे या महाविद्यालयांत ३ जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती महाविद्यालयांतर्फे देण्यात आली आहे. दरम्यान, प्रत्येक महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या जागांपेक्षा अधिक अर्ज महाविद्यालयात आल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

‘नूतन मराठा’त आज शेवटचा दिवस
नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थीसंख्या बघता उद्या (ता.३०) एक दिवस अर्ज जमा करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थीसंख्या अधिक संख्या असल्याने व कागदपत्रे बाकी असल्याने विद्यार्थ्यांना एक दिवस मुदतवाढ दिली असल्याची माहिती प्राचार्य एल. पी. देशमुख यांनी दिली.

महाविद्यालयांची स्थिती
(महाविद्यालयाचे नाव, उपलब्ध जागा, अर्ज)

मू. जे. महाविद्यालय     १०८०,    १७५०
नूतन मराठा महाविद्यालय     ५००,    ५६०
बेंडाळे महाविद्यालय    २२०    ३००
धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी     २४०    ३७८
बाहेती महाविद्यालय    १२०    ७४

Web Title: jalgav news 3000 for for eleventh science