सुनावणी झालेले ६५५ गाळे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

‘मनपा’च्या प्रक्रियेस वेग; ९२८ गाळेधारकांची सुनावणी बाकी
जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या २८ व्यापारी संकुलांपैकी १८ व्यापारी संकुलातील  २१७५ गाळे दोन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश शुक्रवारी (ता. १४) औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. महापालिकेने गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया १५ दिवसात सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ६५५ सुनावणी पूर्ण गाळे ताब्यात घेण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

महापालिकेने गाळेधारकांना महापालिका अधिनियम ८१ (ब) नुसार नोटिसा दिल्या होत्या. या नोटीसांवर २ हजार १७५ पैकी केवळ सेंट्रल फुले व्यापारी संकुल ३११, रामलाल चौबे व्यापारी संकुल ४०, भोईटे व्यापारी संकुल २४, जुने बी.जे.व्यापारी संकुल २४, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल २१६ असे एकूण ६५५ गाळेधारकांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता १५ दिवसात गाळे ताब्यात घेण्याची प्रकिया सुरू करण्याचे आदेश दिलेले असून सुनावणी झालेले हे गाळे ताब्यात घेण्याची प्रकिया लगेच सुरू करता येईल का. याबाबत माहिती घेणे सुरू आहे. गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच राबविली जाणार आहे.

९२८ गाळेधारकांची सुनावणी बाकी
महापालिका प्रशासनाकडून ६५५ गाळे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून उर्वरित ९२८ गाळेधारकांनाही नोटीस दिल्या जात आहे. त्यांची सुनावणी घेऊन गाळे ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. 

Web Title: jalgav news 655 shops of the hearings are in operation