अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनासाठी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

राज्यभर आंदोलन; ऑगस्टमध्ये मुंबईत महामोर्चा

जळगाव - राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढविण्याबाबत शासनाने आश्‍वासन दिले आहे. परंतु, अद्यापपर्यंत मानधन वाढ झाली नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा करत आंदोलन केले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने आज राज्यातील सर्व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर दुपारी बाराला मोर्चा काढून लक्ष वेधले. संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चा यशस्वितेसाठी सुषमा चव्हाण, मंगला नेत्रे, मीनाक्षी चौधरी, पुष्पा गवळी, पुष्पा परदेशी, सविता महाजन, साधना पाटील आदींचे सहकार्य लाभले.
संघटनेतर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने देशातील आसाम, त्रिपुरा या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपेक्षा राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमी मानधन दिले जाते. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सेवा समाप्ती लाभामध्ये सुधारणा करून जास्त सेवा, जास्त लाभ याप्रमाणे सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना भविष्यनिर्वाह निधी लागू करण्यात यावा. आजारपणाची रजा तसेच उन्हाळी सुटी पगारी लागू कराव्यात यावी.

यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास ४ ऑगस्टला राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यांपासून अंगणवाडी केंद्र बंद करून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: jalgav news anganwadi employee front for honorarium