‘संकुल बंद’च्या निर्णयापूर्वीच व्यापाऱ्यांकडून स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

दुपारपर्यंत महात्मा फुले संकुलाचा बहुतांश भाग चकाचक
उपविभागीय अधिकारी शर्मा यांची आज भेट

 

जळगाव - शहरातील महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलात आज व्यापाऱ्यांनी एकत्र येत सकाळपासूनच संकुल स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. दुपारपर्यंत संकुलाचा बहुतांश भाग स्वच्छ झाला. उद्या (२४ जुलै) सकाळी उपविभागीय अधिकारी जलज शर्मा संकुलातील स्वच्छतेची पाहणी करतील. त्यानंतर संकुल बंद करावयाचे किंवा नाही, यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. 

दुपारपर्यंत महात्मा फुले संकुलाचा बहुतांश भाग चकाचक
उपविभागीय अधिकारी शर्मा यांची आज भेट

 

जळगाव - शहरातील महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलात आज व्यापाऱ्यांनी एकत्र येत सकाळपासूनच संकुल स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. दुपारपर्यंत संकुलाचा बहुतांश भाग स्वच्छ झाला. उद्या (२४ जुलै) सकाळी उपविभागीय अधिकारी जलज शर्मा संकुलातील स्वच्छतेची पाहणी करतील. त्यानंतर संकुल बंद करावयाचे किंवा नाही, यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. 

गोलाणी व्यापारी संकुलातील स्वच्छतेनंतर महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलातील स्वच्छता होण्यासाठी उपविभागीय अधिकारी शर्मा यांनी शनिवारी (२२ जुलै) महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी व व्यापाऱ्यांना नोटीस दिली होती. त्या अनुषंगाने स्वच्छतेसाठी दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ देऊन नंतर संकुल बंदचा निर्णय घेण्यात येईल, असे नोटिशीत म्हटले होते. त्यानुसार काल सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांना नोटिसा देण्याचे काम झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.

‘गोलाणी’सारखे महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुल बंद झाल्यास आपणास व्यवसाय बंद ठेवावा लागेल. सोबतच आर्थिक नुकसानही होईल. याचा धसका घेत आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी त्यांची माणसे लावून आपापल्या दुकानांसमोरील परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. अनेक व्यापारी स्वतः स्वच्छता करताना दिसून आले. रविवार असूनही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवून दुकानाची व बाहेरची स्वच्छता करण्याला प्राधान्य दिले.

अनेक महिन्यांपासून साचलेला कचरा, तुंबलेल्या नाल्या, भरलेल्या कचराकुंडी, गुदामासमोरील घाण स्वच्छ करण्याची धडपड सुरू होती. स्वच्छता झाल्यानंतर परिसर धुवून स्वच्छ करण्यात येत होता.

शिवाजीनगर, वाल्मीकनगरातील स्वच्छतेची पाहणी
महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त किशोर राजे निंबाळकर यांनी आज सकाळी शिवाजीनगर, गेंदालाल मिल, कांचननगर, चौगुले प्लॉट, शनिपेठ, वाल्मीकनगर या भागात जाऊन स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत सूचनाही दिल्या. अनेक ठिकाणी बांधकामाचे ‘रॉ मटेरिअल’ अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. ते संबंधितांना उचलण्यास सांगून संबंधितांना नोटीस बजावण्यास सांगण्यात आले. उपायुक्त चंद्रकांत ठोसे, लक्ष्मीकांत कहार, आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: jalgav news businessman cleaning before complex close decission